कुंदे

गावाचा इतिहास

परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील डोंगराच्या कुशीत लपलेलं आमचं गाव. गावाचे नाव कुंदे गावाच्या चहुबाजुला असलेले डोंगर हे गावाचं रक्षण करतात तसेच पांडव कालीन वास्‍तव्‍य खुणांची जाणीव करून देतात. कुंदे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कुंदे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 22किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 03 किमी अंतरावर स्थित आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये दोन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 6 कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व 5 कर्मचारी आहेत.

भौगोलिक परिस्थिती

कुंदे गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावाच्या सीमेला कसाल, कुसबे,आंब्रड,ओरोस,वर्दे ही गावे आहेत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते

ग्रामपंचायतीबद्दल व इतर माहिती

कुंदे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कुंदे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे २४ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १० किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये ०९ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ११४७ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये २ प्राथमिक शाळा, ३ अंगणवाडया आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये ८ कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व २ कर्मचारी आहेत. तसेच कुंदे गावास तंटामुक्‍त मुक्त गाव ,निर्मल ग्राम, पर्यावरण विकास रत्‍न पुरस्‍कार व स्‍मार्ट ग्राम पुरस्‍कार प्राप्त झालेले आहेत

प्राथमिक माहिती
  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : २०-१०-१९५७

  • एकूण लोकसंख्या : 1147

  • एकूण कुटुंबे : 267

  • पुरुष : 566

  • महिला : 589

  • मतदारांची संख्या -1006

  • पुरुष - 532- स्त्री - 474

  • एकूण क्षेत्रफळ - 1059 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 917 hectares

  • वन क्षेत्र - 20.17 hectares

  • बागायत क्षेत्र – 25.20 hectares

  • अंगणवाडी- 3,

  • जिल्हा परिषद शाळा - 2

  • सार्वजनिक मंदिर- 8

  • सार्वजनिक विहीर - 11

  • सार्वजनिक पाण्याची टाकी - २